सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 राजकारण

पुणेकरांची निष्ठेला निष्ठेनं साथ! प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला; काँग्रेसनं पुण्यात खातं खोललं

डिजिटल पुणे    16-01-2026 13:25:29

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांनी भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवून अभिजीत शिवरकर यांना पराभूत केले. यामुळे पुण्यात काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण विजय मिळाला असून, आत्तापर्यंत काँग्रेसचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

प्रशांत जगताप हे १८०० मतांनी विजयी झाले आहेत. विजयानंतर त्यांनी सांगितले, “जवळजवळ चार आमदार आणि दोन माजी राज्यमंत्री माझ्या विरोधात होते. सर्वांचा पराभव करून हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेला मी नेहमीप्रमाणे प्राधान्य देतो. समाजात आदर्श आजही टिकतो आणि पुढेही टिकेल. विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे.”

कोण आहेत प्रशांत जगताप?

प्रशांत जगताप यांनी 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली. पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले असून, ते वानवडी प्रभागातून निवडून येत आहेत.2016-17 या कालावधीत त्यांनी पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. 2021 मध्ये त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 2023मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढवली होती.प्रशांत जगताप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर पदी राहिलेले आहेत.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून ओळख आहे.शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून प्रशांत जगताप यांची पुण्यात ओळख  आहे.2024 विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून लढवली होती.सलग तीन वेळा वानवडी परिसरातून नगरसेवक राहिले आहेत.2007,2012 आणि 2017 या तिन्ही महापालिका निवडणुकीत प्रशांत जगताप निवडून आले.

महापालिकेत महापौर,पीएमपीएल संचालक,पक्ष वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.प्रशांत जगताप हे शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे जवळचे सहकारी असून पुण्यातील एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.


 Give Feedback



 जाहिराती