सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
 शहर

ज्येष्ठ वास्तुविशारद नचिकेत पटवर्धन , ज्येष्ठ अभियंता दिवाकर निमकर यांना 'एईएसए जीवनगौरव' प्रदान

डिजिटल पुणे    17-01-2026 11:00:49

पुणे : आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए) यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा 'एईएसए जीवन गौरव पुरस्कार- २०२६' ज्येष्ठ वास्तुविशारद नचिकेत पटवर्धन आणि ज्येष्ठ अभियंता दिवाकर निमकर यांना प्रदान करण्यात आला. वास्तुरचना व अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रदीर्घ, सातत्यपूर्ण आणि पुणे शहराच्या विकासाला दिशा देणाऱ्या योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रस्ता येथे  हा गौरव सोहळा पार पडला. ‘सॉलिटेअर’ यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ अभियंता व एस. जे. कॉन्ट्रॅक्ट्स प्रा. लि.चे संचालक सुहास जंगले, ज्येष्ठ वास्तुविशारद व्ही. व्ही. बडवे आणि ज्येष्ठ अभियंता सी. ई. गोडसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.'युरो बॉण्ड 'च्या वतीने सादरीकरण करण्यात आले.  

या प्रसंगी ज्येष्ठ वास्तुविशारद संध्या शहा लिखित  ‘नरी गांधी : द डिव्हाईन आर्किटेक्ट ऑफ ऑरगॅनिक फॉर्म’ या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध वास्तुविशारद मनीष बँकर यांचे विशेष व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला विश्वास कुलकर्णी,जयंत इनामदार,केशव देसाई,अजय गुजर,शिरीष केंभवी,प्रशांत देशमुख,'कोपाल पब्लिशिंग' चे प्रकाशक,वर्ड बुक शॉपचे वितरक अजय जैन,श्रीकांत निवसरकर, वास्तुविशारद, अभियंते, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर आणि निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.एईएसए चे प्रेसिडेंट आर्किटेक्ट राजीव राजे यांनी स्वागत केले.आर्किटेक्ट आलोका काळे यांनी सूत्रसंचालन केले.आर्किटेक्ट संजय तासगावकर यांनी आभार मानले. दिवाकर निमकर यांनी आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए) च्या पुढील कार्यासाठी १ लाख रुपये देणगी जाहीर केली.

एईएसएचे अध्यक्ष महेश बांगड यांनी  सांगितले की, पुणे शहराच्या विकासात गेली ५५ वर्षे एईएसए संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. १९७० साली स्थापन झालेल्या या संस्थेने ज्ञानाचा प्रसार, मूल्याधारित व्यावसायिकता आणि स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर समन्वय साधत बांधकाम क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. वास्तुकला आणि स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च दर्जाचे काम समाजासमोर आणणे आणि त्याचा सन्मान करणे हा जीवन गौरव पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.नचिकेत पटवर्धन आणि दिवाकर निमकर यांचा गौरव हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून, संपूर्ण वास्तुकला आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे, असे मत यावेळी  मान्यवरांनी व्यक्त केले.नचिकेत पटवर्धन आणि ज्येष्ठ अभियंता दिवाकर निमकर यांनीही मनोगत व्यक्त केले.


 Give Feedback



 जाहिराती