सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
  • प्रभाग क्रमांक 10 मधुन भाजपाचे चार ही उमेदवार विजयी
  • प्रभाग क्रमांक १८ ड मधून अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे प्रशांत जगताप विजयी
  • कोल्हापूर प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुती सर्व जागांवर विजयी
  • दक्षिण मुंबईत भाजपनं खातं उघडलं! वॉर्ड २१४, २१५ मधून भाजपचा विजय
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी ;भाजप 47 ठिकाणी तर राष्ट्रवादी 6 काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
  • पुणे निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी; भाजप 27 ठिकाणी तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
  • प्रभाग क्रमांक २५ मध्ये दुसऱ्या फेरीत ही भाजपा उमेदवारांची आघाडी कायम
 राजकारण

पुण्यात भाजप सर्वात मोठा पक्ष, सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा ;गणेश बीडकरांनी काढला 2017 च्या पराभवाचा वचपा; रवींद्र धंगेकरांच्या मुलगा आणि पत्नीचा पराभव

डिजिटल पुणे    17-01-2026 12:57:45

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध करत सत्ता स्थापनेच्या दिशेने निर्णायक वाटचाल केली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या लढतीत भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी माजी आमदार रवींद्र धंगेकरांचे पुत्र प्रणव धंगेकर यांचा पराभव करत 2017 मधील पराभवाचा वचपा काढला आहे.

प्रभाग क्रमांक 24 मधील या हायव्होल्टेज लढतीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. अखेर बीडकरांनी बाजी मारत धंगेकर कुटुंबाला मोठा धक्का दिला. याशिवाय रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचाही प्रभाग क्रमांक 23 मधून पराभव झाला आहे.

2017 चा हिशेब चुकता

2017 च्या नगरसेवक निवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी गणेश बीडकरांचा पराभव केला होता. यावेळी बीडकरांसमोर थेट धंगेकरांचा मुलगा प्रणवचे आव्हान होते. मात्र, यावेळी मतदारांनी भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आणि बीडकरांनी दणदणीत विजय मिळवला.

गणेश बीडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात.

पुणे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 82 जागांची गरज

पुणे महापालिकेच्या एकूण 162 जागांसाठी 52.59 टक्के मतदान झाले. सत्ता स्थापन करण्यासाठी 82 जागांची आवश्यकता आहे.

निवडणुकीत –

अजित पवार गटाची राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र,

भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्र,

उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांची युती,

मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार मैदानात होते.

भाजप सर्वात मोठा पक्ष

सध्याच्या निकालानुसार,

भाजप 63 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर,

राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर,

शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस आणि इतर पक्ष पिछाडीवर आहेत.

मनसेला यंदाच्या निवडणुकीत एकही जागा मिळवता आलेली नाही. शहरातील अनेक प्रभागांमध्ये भाजपने पॅनल जिंकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

महापौरपदावर भाजपची मोहोर जवळपास निश्चित

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने पुणे महापालिकेत भाजपचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. अंतिम आकडे स्पष्ट होत असताना भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.पुणे महापालिका निवडणुकीत भाजप हाच एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजप सध्या 63 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं पुणे महानगरपालिकेत भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पुण्यात भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. राष्ट्रवादी दुसऱ्या नंबर वर गेला आहे. मनसेला पुण्यात खातं सुद्धा उघडता आले नाही. पुणे शहरातील अनेक प्रभागात भाजपने पॅनल जिंकले आहेत. 


 Give Feedback



 जाहिराती