पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्र अभिमन्यू अर्जुन जाधव याची प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली आहे.महाराष्ट्रातून १२७ कॅडेटची या संचलनासाठी निवड झाली आहे. त्यात पुणे ग्रुप मधून ४७ कॅडेटची निवड झाली असून त्यामध्ये २ महाराष्ट्र बटालियनचे १५ कॅडेटची निवड झाली आहे. यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपुर, मुंबई अ, मुंबई ब आणि पुणे यांचा समावेश असतो. यात अभिमन्यू अर्जुन जाधव हा बाबुरावजी घोलप महाविद्यालयाचा व २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी चा छात्र आहे. त्याने तीन महिन्यांच्या मेहनतीत दहा दिवसांचे एक शिबीर असे दहा शिबिरे पूर्ण केले आहे. सदर कॅम्पमध्ये मेहनत, परिश्रम व नियमित सराव करून दिल्लीला पोहचला आहे. यामुळे पुणे एनसीसी ग्रुप, २ महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय व पुणे-पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचविले आहे.
राष्ट्रीय पथसंचलनासाठी निवड होणे महाविद्यालयाच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मत प्राचार्य डॉ. संगीता जगताप यांनी व्यक्त केले. कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होणाऱ्या संचलनासाठी मला संधी मिळणे हे माझ्यासह कुटुंबीयांसाठी गौरवाची बाब आहे, खूप सरावानंतर ही संधी मला मिळाली आहे, त्यामुळे माझे व माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण झाले असल्याचे छात्र अभिमन्यू अर्जुन जाधव याने सांगितले.बाबुरावजी घोलप महाविद्यालयामध्ये एनसीसी युनिट शैक्षणिक वर्ष २०१६ मध्ये सुरू झाले असून अनेक छात्रांची सैन्यदल, पोलीसदल व अग्निशामक दलात निवड झाली आहे. तसेच आतापर्यंत सहा छात्रांची कर्तव्य पथ (राजपथ) दिल्ली येथे होत असलेल्या पथसंचलनासाठी निवड झालेली असून आमच्यासाठी कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहे, अशी माहिती एनसीसी युनिटचे प्रमुख कॅप्टन डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांनी दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता जगताप, २ महाराष्ट्र बटालियनचे कमाडिंग ऑफिसर कर्नल फिरदोस दुभाष, अडमीन ऑफिसर लेफ्टनंट कर्नल प्रवीण कुमार, बटालियनचे सर्व स्टाफ व एनसीसी युनिटचे प्रमुख कॅप्टन डॉ.विठ्ठल नाईकवाडी यांच्याकडून छात्र अभिमन्यू अर्जुन जाधव यास प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.अजितदादा पवार साहेब, उपाध्यक्ष मा.राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. ॲड. संदीप कदम, खजिनदार मा.मोहनराव देशमुख, उपसचिव मा. एल.एम.पवार, सहसचिव मा.ए.एम.जाधव, प्राचार्य डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सीमा चौहान, एनसीसी युनिटचे प्रमुख कॅप्टन डॉ. विठ्ठल नाईकवाडी व महाविद्यालयीन स्टाफ यांनी निवड झालेल्या कॅडेटचे कौतुक करून दिल्लीच्या संचलनास सुभेच्छा दिल्या.
