सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अपघात रोखण्यासाठी ‘पीटीझेड ‘ कॅमेरे,नवले पुलाजवळ बसविले,वेगावर नियंत्रण राहणार
  • मोठी बातमी: पुण्यात आंदेकर गँगच्या उमेदवाराचा विजय, रवींद्र धंगेकरांच्या पत्नीलाच पाडलं
 जिल्हा

यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजने (NSS) अंतर्गत सात दिवसीय निवासी शिबीर संपन्न

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    20-01-2026 09:52:52

उरण :उरण तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या यु. ई. एस. कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत (NSS) सात दिवसीय निवासी शिबीराचं दिनांक १२-०१-२०२६ ते १८-०१-२०२६ ह्या कालावधी मध्ये द्रोणागिरी हायस्कूल करंजा, उरण येथे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिराचे उद्घाटन यु. ई. एस. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठक्कर ह्यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत यु. ई. एस. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर, द्रोणागिरी शाळा समितीचे प्रशासक हर्षद कोळी, करंजा गावचे सरपंच अजय गोविंद म्हात्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कोळी, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. मिनाक्षी गुप्ता, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.

या शिबिरामध्ये एकूण ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. संस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगांवकर यांनी एनएसएसच्या विद्यार्थ्यांना एकत्रित कामाचे महत्त्व सांगितले.ह्या शिबीरा मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, जसे की दररोज योगा, श्रमदान, मनोहर म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षण कसे करायचे ह्याचे प्रशिक्षण दिले, डॉ. सत्या ठाकरे यांचे करिअर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले आणि रिलायन्स ॲनिमेशन ॲण्ड मीडिया टीमद्वारे ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि कॉमिक्सवर माहितीपूर्ण सत्र यांसारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले. हर्षद कोळी यांनी व्यवसाय कसा सुरू करावा यावर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांनी शाळेतील भिंतींवर चित्रकला (वॉल पेंटिंग) केली.

तसेच विदयार्थ्यांनी स्वच्छ भारत, आपत्ती व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यावर सामाजिक जनजागृती रॅलीचे आयोजन केले. एनएसएस स्वयंसेवकांनी शाळेतील मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श तसेच इतर सामाजिक विषयांवर जागरूकतापर मार्गदर्शन केले. तर यु. ई. एस. संस्थेचे मानद सचिव ॲड. राजेंद्र भानुशाली यांनी जीवनविषयक तत्त्वज्ञान ह्या विषयावर विदयार्थ्यांना व्याख्यान दिले.सात दिवस चाललेल्या ह्या निवासी शिबीरामुळे विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचें ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या मध्ये शिस्त निर्माण होऊन, जीवनाला बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन अजून सकारात्मक झाल्याचं पाहण्यात आले. ज्यामुळे हा सात दिवसीय निवासी शिबीर, सर्व शिक्षक तसेच सर्व व्यवस्थापकीय सदस्यांच्या कौतुकास पात्र ठरला. सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या व वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख ह्यांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला.


 Give Feedback



 जाहिराती