सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 शहर

बजाज पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणेकरांनी अनुभवला वेगवान थरार

डिजिटल पुणे    21-01-2026 10:39:13

पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर अंतर्गत आज पहिल्या टप्प्याची सुरुवात टीसीएस सर्कल, हिंजेवडी येथून उत्साहात झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या सायकल स्पर्धेला अबालवृद्ध पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय म्हणून अभिमान बाळगत नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून सायकलपटूंना प्रोत्साहन दिले.या वेळी नागरिकांनी नामवंत सायकलपटूंची तंदुरुस्ती, शिस्तबद्ध तयारी आणि धावत्या सायकलींचा वेगवान थरार अनुभवला. आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे प्रथमच होणारे आयोजन आणि त्यातून दिला जाणारा पर्यावरण रक्षण व आरोग्याचा संदेश नागरिकांना आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रीयेवरून दिसून आले. तरुणाईला स्पर्धेमुळे मिळत असलेली प्रेरणाही त्यांच्या प्रतिसादातून आणि बोलण्यातून व्यक्त झाली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले. फैजान अन्सारी (मुंबई) म्हणाले, “मी भारतीय म्हणून मुंबईहून पुण्यात आलो आहे. ही स्पर्धा पाहण्यासोबतच खेळाडूंचे मनोबल वाढविणे, हा उद्देश आहे. आजच्या तरुण पिढीने निरोगी आयुष्यासाठी सायकलचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे.”

साक्षात छत्रपती शिवाजी महाराज या मातीच्या कणकणात असल्याची अनुभूती इथे आल्यावर होत असल्याचे राजस्थानच्या संतोष वर्मा यांनी पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत सांगितले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीत बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन झाले आहे. स्पर्धेच्या मार्गामध्ये महाराजांच्या गडकिल्ल्यांचा समावेश केल्याने त्यांचा ऐतिहासिक वारसा अनुभवता येणार आहे.

स्पर्धेच्या अनुषंगाने करण्यात आलेली रंगरंगोटी, स्वच्छ व सुस्थितीत असलेले रस्ते यामुळे हिंजेवडीसह पुणे परिसराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. सदृढ समाजनिर्मितीसाठी अशा सायकल स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

हिंजवडी ग्रामपंचायतीच्यावतीने या स्पर्धेची माहिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली. जगभरातील तंदुरुस्त खेळाडू प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात उत्तम खेळाडू घडविण्याचे प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त करून स्थानिक शिक्षिका अश्विनी पवार यांनी  अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन पुढेही व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

रमेश मधुरे (माजी सैनिक) यांनी बजाज पुणे ग्रँड टूरचे आयोजन हे पुण्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. नामवंत खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची तसेच स्थानिक सायकलपटूंना प्रेरणा मिळण्याची ही मोठी संधी असल्याचे नमूद करून निरोगी जीवनासाठी सायकलचा वापर ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

स्पर्धेला तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभला. स्पर्धा मार्गावर सायकलपटूंना प्रोत्साहन देतांना युवकांमध्ये उत्साह दिसत होता. माहेश्वरी भताणे यांनी या स्पर्धेपासून प्रेरणा घेत भविष्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत सहभागी होण्याविषयी आत्मविश्वास व्यक्त केला.

जनार्धन शिवरकर खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी पुणेकर म्हणून उपस्थित असल्याचे सांगितले. या स्पर्धेमुळे पुण्याच्या नावलौकीकात भर पडत असल्याबाबत त्यांनी आनंद आणि अभिमानाची भावना  व्यक्त केली.  तर सुनील डांगमाळी यांनी “पुणेकरांनो, जागे व्हा. सायकलचा वापर केल्यास पर्यावरणाचे जतन होईल, प्रदूषणात घट होईल आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सायकल चालवा, आजाराला पळवा.” असा पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश दिला.


 Give Feedback



 जाहिराती