सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 राजकारण

मोठी राजकीय घडामोड: भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यात ‘डील’ झाल्याचे संकेत? मुंबईच्या पाठिंब्याबदल्यात नाशिकमध्ये सत्तेत वाटा मिळणार?

डिजिटल पुणे    21-01-2026 11:42:26

मुंबई : मुंबईसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांनंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जोरदार वाटाघाटी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत भाजपला पाठिंबा देण्याच्या मोबदल्यात नाशिक महापालिकेत शिवसेनेला सत्तेत वाटा देण्याची तडजोड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

मुंबई–नाशिक सत्तासमीकरणावर चर्चा

मुंबईत भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीची शक्यता असताना नाशिकमध्ये मात्र भाजप आणि शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर सत्तेचा दावा करत असला तरीही सध्याच्या घडामोडींमुळे तडजोडीचे संकेत मिळत आहेत.

महापौरपदावरून तणाव

मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मतभेद असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडून महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे, तर भाजप पाच वर्षांचा संपूर्ण कार्यकाळ महापौरपद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे.

नाशिकमध्ये पदांची तडजोड?

मुंबईत महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये शिवसेनेला विविध पदांवर तडजोड मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाशिकमध्ये महापौरपद भाजपकडेच राहण्याची शक्यता असून, उपमहापौर पदस्थायी समिती सदस्य प्रभाग समित्या विषय समित्यांची जबाबदारी ही पदे शिवसेनेला मिळू शकतात, अशी चर्चा आहे.

वाटाघाटींना वेग

मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील चर्चांना सध्या वेग आला आहे. दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सुरू असलेल्या राजकीय चर्चांमुळे विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत. मुंबई आणि नाशिक या दोन्ही महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तासमीकरण पुढील काही तासांत किंवा दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


 Give Feedback



 जाहिराती