सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 शहर

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनची मोहीम ;मोफत कलेक्शन बॉक्स आणि पत्रकांचे वाटप !

डिजिटल पुणे    21-01-2026 14:10:36

पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त घरीदारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान होऊ नये म्हणून भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. नागरिक आणि संस्थांनी इतस्ततः पडलेले ध्वज आढळल्यास ते भारत फ्लॅग फाऊंडेशन,मुरुडकर झेंडेवाले,पासोडया मारूती मंदिरासमोर, बुधवार पेठ येथे जमा करावेत,असे आवाहन  फाऊंडेशनचे संस्थापक गिरिश मुरुडकर,कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव  यांनी केले आहे. गिरीश मुरूडकर -9822013292,राहुल भालेराव -9822596011 यांच्याशी  संपर्क साधता येईल.ज्या तिरंग्यासाठी हजारोनी बलिदान केले,तो तिरंगा पायदळी जाऊ नये,याची काळजी घ्यावी, ध्वजविषयक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे,असे आवाहनही फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे .  

मुरुडकर म्हणाले ,'१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात  किंवा गटारात पडलेले आढळतात.प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाबाह्य ठरते'. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचे हे २४ वे वर्ष आहे.जमा साहित्याची   शास्त्रशुद्ध, सन्मानपूर्वक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.या मोहिमेत सामिल होण्या माहितीपत्रक  व बॉक्सेस  हे फाउंडेशन तर्फे विनामूल्य  पुरवले जातील .दैनंदिन जीवनात विविध मार्गांनी देशसेवा करावी. पेट्रोल वापर कमी करणे,कचरा व्यवस्थापन करणे,अन्न वाया न घालवणे,हॉर्न द्वारे होणारे ध्वनिप्रदूषण रोखणे ही देखील देशसेवा असल्याचे फाउंडेशनच्या पत्रकात म्हटले आहे.  

गेल्यावर्षीपासून शेठ हिरालाल सराफ प्रशालेत मुख्याध्यापक मनीषा हवालदार यांच्या सहकार्याने फाउंडेशनतर्फे कल्पक कलावर्ग विद्यार्थ्यांसाठी चालवले जातात. नियोजित उपक्रम "स्वतः गणपती बनवा",तसेच विद्यार्थ्यांसाठी अभिनय कार्यशाळा हे  आहेत ,त्यासाठीही संपर्क साधावा ,अशी माहिती देण्यात आली. 


 Give Feedback



 जाहिराती