उरण : जिल्हा परिषद सदस्य पदासाठी नवघर गट मधुनवंचित बहुजन आघाडी तर्फे सोनाली तुषार गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.उमेदवार सोनाली तुषार गायकवाड या महिला सामाजिक कार्यकर्त्या असून त्या वंचित बहुजन आघाडीच्या उरण तालुका उपाध्यक्ष तुषार उत्तम गायकवाड यांच्या पत्नी आहेत.सोनाली गायकवाड व तुषार गायकवाड यांनी एकत्रितपणे अनेक विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रम हाती घेऊन गोर गरिबांचे अनेक अडचणी सोडविल्या आहेत. उरण मधून नवी मुंबई, मुंबई साठी बेस्ट प्रवास सुरु करून सोनाली गायकवाड व तुषार गायकवाड यांनी उरण तालुक्यातील नागरिकांना, प्रवाशांना खूप मोठा दिलासा दिला आहे. विविध नागरिकांच्या समस्या समजाऊन घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न ते नेहमी करीत असतात.त्यामुळे सोनाली तुषार गायकवाड यांना वंचित तर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी जोरदार शक्ती उमेदवारी फॉर्म भरला. यावेळी उरण तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे,उरण तालुका उपाध्यक्ष तुषार उत्तम गायकवाड,रायगड जिल्हा अध्यक्ष ( उ ) दिपक गायकवाड,
खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव, इतर पदाधिकारी तसेच उरण रहिवाशी, भूपाळी सोसायटी, मल्हार सोसायटी, भैरवी सोसायटी रहिवाशी उपस्थित होते.यावेळी तुषार गायकवाड यांनी एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्या. जेणेकरून विकासकामे करून जनतेचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील असे आवाहन केले आहे.