सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 विश्लेषण

अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट;अंतराळातील मॅरेथॉनपासून आर्टेमिसपर्यंत; सुनिता विल्यम्स यांची यशोगाथा

डिजिटल पुणे    21-01-2026 16:35:54

वॉशिंग्टन :  भारतीय वंशाच्या जगप्रसिद्ध अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांनी नासामधील आपल्या 27 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर निवृत्ती जाहीर केली आहे. नासाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, 27 डिसेंबर 2025 पासून सुनिता विल्यम्स या सेवानिवृत्त झाल्या आहेत. 1998 मध्ये नासाद्वारे त्यांची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली होती.

608 दिवस अंतराळात; दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम

सुनिता विल्यम्स यांनी तीन अंतराळ मोहिमांमध्ये एकूण 608 दिवस अंतराळात घालवले आहेत. नासाच्या अंतराळवीरांमध्ये सर्वाधिक काळ अंतराळात राहणाऱ्या व्यक्तींच्या यादीत त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या या कामगिरीने त्या अंतराळ इतिहासातील एक महत्त्वाचे नाव ठरल्या आहेत.

गुजरातशी नातं; भारताचा अभिमान

सुनिता विल्यम्स यांचे वडील मूळचे गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन गावाचे होते. भारतीय मुळे असलेल्या सुनितांनी जागतिक पातळीवर भारताचा नावलौकिक वाढवला.‘अंतराळ हेच माझं आवडतं ठिकाण’निवृत्ती जाहीर करताना भावना व्यक्त करताना सुनिता म्हणाल्या,“अंतराळ हे माझे सर्वात आवडते ठिकाण आहे. या 27 वर्षांच्या प्रवासात मला साथ देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांची आणि नासाची मी ऋणी आहे.”नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी सुनिता विल्यम्स यांचे वर्णन‘मानवी अंतराळ मोहिमांमधील मार्गदर्शक (Trailblazer)’ असे केले आहे.

स्पेसवॉकमध्ये जागतिक विक्रम

सुनिता विल्यम्स यांनी 9 वेळा स्पेसवॉक केले असून, त्यासाठी त्यांनी 62 तास 6 मिनिटे अंतराळात बाहेर काम केले आहे.महिला अंतराळवीरांमध्ये हा जागतिक विक्रम आहे. अंतराळात मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.

वैज्ञानिक योगदान आणि भविष्याचा पाया

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) त्यांनी अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले.चंद्रावरील ‘आर्टेमिस’ मोहिम तसेच भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी भक्कम पाया रचण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

सुनिता विल्यम्स यांच्या तीन प्रमुख मोहिमा

 पहिली मोहीम (2006) – 9 डिसेंबर 2006 रोजी ‘डिस्कव्हरी’ अंतराळयानातून पहिले उड्डाण

 दुसरी मोहीम (2012) – 127 दिवसांची मोहीम; अमोनिया गळती थांबवणे व सोलर ॲरे दुरुस्ती

 तिसरी मोहीम (2024–25) – बोईंग स्टारलायनर चाचणी मोहीम; तांत्रिक अडचणींमुळे नियोजित 10 दिवसांची मोहीम तब्बल 9.5 महिने चालली; मार्च 2025 मध्ये पृथ्वीवर यशस्वी पुनरागमन

अंतराळ इतिहासात अढळ स्थान

अंतराळ संशोधन, शिस्त, धाडस आणि प्रेरणादायी कारकिर्दीमुळे सुनिता विल्यम्स यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल, यात शंका नाही.


 Give Feedback



 जाहिराती