सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 शहर

पुण्यातील हृदयद्रावक घटना! सायकलवर खेळणाऱ्या चिमुकल्याचा कारच्या धडकेत मृत्यू;पोलिसांत गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    23-01-2026 14:39:00

पुणे : पुण्यातील लोणी काळभोर परिसरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. सोसायटीच्या आवारात सायकलवर खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकल्याला कारची धडक बसून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना 19 जानेवारी रोजी दुपारी घडली असून, संपूर्ण प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निष्कर्ष आश्वत स्वामी (वय 5) हा मुलगा लोणी काळभोरमधील जॉय नेस्ट सोसायटीच्या पार्किंग परिसरात सायकलवर खेळत होता. याच वेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या कारच्या समोर तो अचानक आल्याने चालकाला तो दिसला नाही आणि कारची धडक बसली. कारचा वेग कमी असतानाही धडकेमुळे निष्कर्ष गंभीर जखमी झाला.अपघातानंतर निष्कर्षला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी निष्कर्षचे वडील आश्वत नारायण स्वामी (वय 40, रा. जॉय नेस्ट सोसायटी, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.ही घटना शहरातील सोसायटी परिसरात वाहन चालवताना विशेष खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित करते.


 Give Feedback



 जाहिराती