सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अंतराळात विक्रम रचणाऱ्या सुनिता विल्यम्स यांची नासातून एक्झिट ;तीन मोहिमा, 9 स्पेसवॉक, 608 दिवस; सुनिता विल्यम्स यांची ऐतिहासिक निवृत्ती
  • तीन मोहिमेतून तब्बल 608 दिवस अंतराळात घालवलेल्या सुनिता विल्यम्स यांची 'नासा'तून निवृत्ती; अंतराळ रणरागिनीची सोन्याची पावलं आता जमिनीवर 'विसावणार'
  • शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
  • ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
 जिल्हा

उरण महाविद्यालयात रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    27-01-2026 13:01:54

उरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, लायन्स क्लब उरण, लिओ क्लब उरण, टायगर ग्रुप, राजे शिवाजी मित्र मंडळ उरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले. यावेळी महात्मा गांधी मिशन कामोठे नवी मुंबईच्या ब्लड बँकेचे सहाय्य घेण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही व्ही गर्जे, एम जे एफ ला.मा. सदानंद गायकवाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष रावसाहेब ओहोळ , उपाध्यक्ष ला. संदीप सदानंद गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष  विशाल पाटेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.महाविद्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दुसऱ्यांदा रक्तदान शिबिर आयोजित केले गेले, या रक्तदान शिबिरात एकूण ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले व आपली सामाजिक बांधिलकी त्या माध्यमातून जपण्याचा प्रयत्न केला, महात्मा गांधी मिशनचे डॉ. शुभम शिंगारे, डॉ. नम्रता भोईर, डॉ. प्राची घरत, डॉक्टर निकिता चोरट आदींनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील  सदस्य,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्तदान शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.


 Give Feedback



 जाहिराती