सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
  • : अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू; महाराष्ट्र हादरला, बारामतीमध्ये नेमकं काय घडलं?
  • भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील 'दादा' पर्वाचा बारामतीत करुण अंत
 विश्लेषण

महाराष्ट्राच्या ‘लाडक्या दादांना’ उद्या अखेरचा निरोप; बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डिजिटल पुणे    28-01-2026 16:31:13

बारामती : अवघ्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. या दु:खद अपघातात अजित पवारांसह विमानातील सर्व 5 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

बारामतीत लँडींग करताना विमानाने हवेत गिरट्या घेतल्या आणि क्षणार्धात ते खाली कोसळले. येथील एका शेतात विमानाचा मोठा स्फोट झाला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट शांभवी पाठक यांच्यासह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, सुमित कपूर यांना विमान प्रवासाचा मोठा अनुभव होता, तर शांभवी पाठक यांच्याकडे १५०० तासांची फ्लाईट सेवा अनुभव होता; तरीही हा अपघात टाळता आला नाही.

राजकीय क्षेत्रातील हा मोठा धक्का असून राज्याचे राजकारण हादरले आहे.उद्या, 29 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाचे बारामतीतील कर्मभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पार्थिवाला विद्या प्रतिष्ठान मैदानावर आणले जाणार असून, उपस्थित नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना अंतिम दर्शनाची संधी दिली जाईल. अंत्यसंस्कारावेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.

यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देखील बारामतीत उपस्थित राहणार आहेत. पवार कुटुंबाने त्यांच्या कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

घड्याळामुळेच अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यांच्या मनगटावरील घड्याळ हेच त्यांच्या राजकीय प्रवासाचे प्रतीक बनले होते. हे घड्याळ आता त्यांच्या शेवटच्या ओळखीचे माध्यम ठरले.हा राज्य आणि राष्ट्रासाठी दु:खद दिवस आहे. महाराष्ट्राने आपला लाडका नेता गमावला आहे, आणि त्याचे योगदान नेहमी स्मरणात राहणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती