सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
  • ज्या मातीतून रोपटं उगवलं त्याच मातीत विलीन होणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत अंत्यसंस्कार, शोकाकुल वातावरण
  • अवघ्या महाराष्ट्राच्या अश्रुंचा बांध फुटला, बारामती पोरकी झाली; अजित पवार पंचत्वात विलीन
  • अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला; 'कामाचा माणूस' अनंतात विलीन, अवघा सह्याद्री हळहळला
  • : मोठी बातमी : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, बारामतीमध्ये लॅंडींगदरम्यान घडली घटना
 जिल्हा

हायवेवरील ‘देवदूत’ कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाचा रस्त्यावर उतरून संघर्ष

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    29-01-2026 11:17:12

उरण : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या  ‘देवदूत’ कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे आयर्न पंप कंपनी  प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात आले.या कामगारांकडून अत्यंत धोकादायक व जबाबदारीचे काम  करून घेतले जात असतानाही त्यांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण, सुरक्षितता साधने, कामाचे निश्चित तास व कायदेशीर हक्क मिळत नाहीत. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले.या आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब भुजबळ – संघटन सचिव, भारतीय मजदूर संघ सचिन मेंगाळे – भारतीय मज़दूर संघ उपाध्यक्ष, महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सागर पवार – सचिव, पुणे जिल्हा  उमेश विश्वाद बाळासाहेब पाटीलयांनी केले.यावेळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला की, देवदूत कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल  व ही लढाई राज्य स्तरावर नेली जाईल.भारतीय मजदूर संघाने कंपनी व्यवस्थापन  व संबंधित यंत्रणांना आवाहन केले आहे की,देवदूत कामगारांना वेतनवाढ, प्रलंबित प्रश्नांबाबत,  ई  सर्व कायदेशीर लाभ व सामाजिक सुरक्षा तात्काळ लागू करावी अशी ठाम मागणी करण्यात आली . 


या बाबतीत त्रिपक्षीय बैठक  संपन्न होवून देशदुत मधील कामगारांना सन्मानजनक वेतनवाढ बाबतीत वरिष्ठ पातळीवर चर्चे करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.कामगार च्या पत्नी व मुलांकरिता सध्या कार्यरत ३ लाख मेडिक्लेम मधे समाविष्ट करण्यात येईल.  सर्व कामगारांना करिता अपघाती मृत्यु विमा योजनेंतर्गत २० लाख  रु चा लाभ देण्यात येणार आहेत.मागील काळातील  प्रलंबितच  ओव्हरटाईम  वेतन लवकरच कामगारांना देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर लेखी स्वरूपात समझोता झाला आहे . त्या मुळे आंदोलन शनिवार ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्यात आले असून या बाबत आर्यन पंप कंपनी ने सकारात्मक निर्णय न झाल्यास  सोमवार २ फेब्रुवारीपासून पासून बेमुदत आंदोलन करण्या बाबतीत इशारा बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश  व सचिन मेंगाळे उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ व सागर पवार यांनी दिला आहे .

 

या बैठकीत कंपनी कडून  व्दिवेश दिवाकर एच आर हेड, निलेश कुडेकर , मॅनेजर,  भारतीय मजदूर संघा कडुन बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव महाराष्ट्र   सचिन मेंगाळे  भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ  , सागर पवार सचिव पुणे , बाळासाहेब पाटील कार्याध्यक्ष,  उमेश विश्वाद संघटन सचिव,  व तालुक्यातील विविध राजकीय पक्ष , सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री आशिष ठोंबरे- शिवसेना तालुकाप्रमुख उबाठा, निखिल कविश्वर- नगरसेवक लोणावळा, धनंजय काळोखे- नगरसेवक लोणावळा, मयूर ढोरे- नगराध्यक्ष वडगांव, नवनाथ हारपुडे- पंचायत समिती उमेदवार, भाऊ गुंड- भाजपा तालुकाध्यक्ष, सनी दळवी- नगरसेवक , गायत्री रिले- नगरसेवक, दिपा आगरवाल- नगरसेवक, मुकेश परमार- नगरसेवक ,  व आर्यन पंप चे कामगार प्रतिनिधी कामगार नितीन निकम,  भुषण पाटील,  आशीष सावंत,  अजय ठोंबरे  कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते .


 Give Feedback



 जाहिराती