सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली शिवसेना पक्षाची अधिकृत भूमिका

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    31-01-2026 10:35:21

उरण : उरण पनवेल मध्ये भाजपचे उमेदवारांसाठी शिंदे सेनेच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दिलेले आदेश पक्षातील सहा उमेदवारांनी धुडकावून लावले आहेत. भाजप शिंदेसेनेत तेढ वाढल्याने महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या आधीच जिल्हाप्रमुखातून अतुल भगत यांना पदावरून दूर केले होते. त्या जागी विनोद साबळे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर शिंदे सेनेचे ४० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा देत संताप व्यक्त केला होता. शिंदे सेनेची भूमिका मांडण्यासाठी  शुक्रवारी (दि.३० )या पत्रकार परिषदचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शिवसेनेच्या अधिकृत भूमिके बद्दल माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले कि ही पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही. तर ही शिंदे शिवसेना गटाची स्थानिक नेतृत्वाबरोबर लढाई आहे. शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याचे व कार्यकर्त्यांचे एक मत आहे की देशामध्ये व राज्यांमध्ये आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहोत. ही आमची शिंदे सेनेची लढाई स्थानिक नेतृत्वाबरोबर आहे. युती होता होता या निवडणुकीत आम्ही उमेदवार उभे केले. काहींना माघार घेण्याचे आदेश दिले. परंतु निवडणुकी संदर्भात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची भूमिका वेगळी आहे. चुकीचे आहे. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. असे ते म्हणाले.

नगरपालिकेची निवडणुक आपल्याला माहित आहे. या निवडणुकीसाठी युती करण्यासाठी आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते आग्रही होतो. परंतु आमदार महेश बालदी यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे आम्ही नगरपालिकेच्या  नगराध्यक्ष पदाच्या व नगरसेवकांच्या पदाच्या उमेदवारासाठी उमेदवार उभे केले. त्यानंतर माघार घेण्याच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर व खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी आमदार महेश बालदी यांनी संपर्क केला. परंतु त्यांची भूमिका तुम्ही माघार घ्या आणि आम्हाला पाठिंबा द्या. अशी होती. या अशा महेश बालदींच्या आडमुठ्या धोरणामुळे ही युती झाली नाही. त्यानंतर  जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकी साठी युती व्हावी. असा कार्यकर्त्यांचा विचार होता. मात्र ही युती न झाल्यामुळे आमच्या शिंदे सेनेच्या १८ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. पक्षाकडून एबी फॉर्म भरले.

मात्र पक्षाकडून माघार घेण्याचे आदेश आले आहेत. असे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगून, उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे काही उमेदवारांनी माघार घेतली. तर सहा उमेदवारांनी माघार घेण्यास नकार दिला. पक्षाने आम्हाला ए  बी फॉर्म दिलेत. त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढू . असा निर्धार करत, शिंदेसेनेतर्फे ही निवडणूक लढविली जात आहे. परंतु पक्षाकडून कुठल्याही प्रकारची मदत केली जाणार नाही. साहित्य व सहकार्य केले जाणार नाही. तर कारवाई करू. असे सांगितले गेले . महेश बालदिंना सपोर्ट करण्यासाठी ही भूमिका आहे. या भूमिकेला आम्ही विरोध करू. उत्तर रायगडचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्या पक्षाला किंवा मित्राला  मदत करण्यासाठी ही भूमिका घेतलेली आहे. हे चुकीचे आहे. त्यानंतर मी प्रचार साहित्य वाटप करून प्रचाराला सुरुवात केली आहे.   

कार्यकर्त्यांना मदत केली पाहिजे. कार्यकर्ता जगला पाहिजे. त्यांना बळ दिले पाहिजे. उरण पनवेलमध्ये उत्तर रायगडचे आमदार थोरवेंनी निवडणुकीच्या काळात मदत न करता हे अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे आम्ही निषेध करत आहोत .भविष्यात त्यांनी अशी भूमिका घेऊ नये. मात्र निवडणुका संपल्यानंतर वरिष्ठांना पक्षश्रेष्ठींना आम्ही या त्यांच्या निगेटिव्ह भूमिकेबद्दल सांगणार आहोत. आणि योग्य ती कारवाई करण्यास सांगणार आहोत. असे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी शेवटी स्पष्ट केले.


 Give Feedback



 जाहिराती