सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

ट्रेलर खाली चिरडून चालकाचा मृत्यू.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    02-02-2026 10:37:07

उरण : उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुतुम येथील IOTL कंपनी शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणा-या लेनवर एका ट्रेलरच्या खाली चिरडून मजुराचा मृत्यू झाला.मृत्यू पावलेल्या मजुराचे नाव बृजभान मुन्डा यादव (३२) असून, तो मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील भीतरी येथील निवासी होता. तो उरण येथे ट्रेलर चालक म्हणून काम करत होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बृजभान यादव याने रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील ट्रेलर क्र. MH-46-BU-4299 हा धुतुम येथील IOTL शेजारील ब्रीजवर जेएनपीटी ते पनवेलकडे जाणा-या लेनवर उतारावर थांबवला होता. त्याने ट्रेलरचा हँन्डब्रेक न लावता ट्रेलरमधून खाली उतरून ट्रेलरच्या समोर गेला असता, ट्रेलर उतारावर असल्याने आणि त्यावर भरलेला कंटेनर असल्याने वजनामुळे ट्रेलर पुढे गेला आणि बृजभान यादव याच्या अंगावरून जाऊन तो गंभीर जखमी झाला.बृजभान यादव याला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटल मध्ये नेले असता त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. उरण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८५, १०६(१) (भा.द.वि कलम ३८३, १०४(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक संजय साबळे यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती