सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

जासई जिल्हा परिषद गटातील उमेदवार डॉ.मनिष पाटील. पं.स.उमेदवार सौ.निर्मला नरेश घरत व सौ.प्रियंका दिपक मढवी यांचा विजय निश्चित - मनोहर भोईर

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    02-02-2026 10:56:31

उरण : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, जासई जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मनीष अनंत पाटील व जासई पंचायत समिती गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवार निर्मला नरेश घरत यांचा जासई धुतुम, करळ, सोनारी,सावरखार, वेश्वी,चिर्ले,दिघोडे,विंधणे ग्रामपंचायतींच्या विविध गावांसह  रानसई  ग्रामपंचायत आदिवासी वाड्या परिसरात प्रचाराचा झंझावात सुरू असून, घर टू घर जाऊन उमेदवार व कार्यकर्ते  प्रचार पत्रकाचे वाटप करत आहेत. प्रत्येक गावागावात उमेदवारांचे जल्लोषात स्वागत होत आहे. मतदार संघातील मतदार हे जागृत मतदार आहेत. महाआघाडीला मत म्हणजे विकासाला मत त्यामुळे जासई  जिल्हा परिषद गटात व चिर्ले पंचायत समिती गणात महा विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली आहे. दरम्यान तालुक्यातील सोनारी,करळ,सावरखार,धुतुम,जासई सह अनेक गावांध्ये रविवारी या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली.

यावेळी उमेदवारांनी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी नागरिकांबरोबर संवाद साधून, हाताचा पंजा व खटारा चिन्हा समोरील बटन दाबून निवडून देण्याचे आवाहन केले. प्रचारात महिला, तरुण मंडळी, जेष्ठ कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून आला. प्रचारात डॉ.मनीष पाटील व निर्मला नरेश घरत व प्रियांका मढवी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. यावेळी काँग्रेसचे महेंद्र घरत,शिवसेना माजी आमदार मनोहर भोईर,जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, प्रेमनाथ ठाकूर, जासईचे सरपंच संतोष घरत,कंठवलीचे जयराम पाटील,  भेंड भेंडखळचे  दिपक ठाकूर, रोहिदास पाटील, मेघश्याम कडू, दिनेश कडू, दिनेश पाटील, नारायण तांडेल ,किशोर कडू, रमाकांत कडू ,दत्ता कडू, कमलाकर पाटील, किशोर कडू, शेखर कडू, अविनाश कडू प्रवीण कडू ,सुनील कडू, विराज कडू, सूचित कडू, प्रमोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील, तुकाराम कडू,अशोक,कडू,दिनेश तांडेल,मुन्ना तांडेल केशव तांडेल,प्रकाश तांडेल,विश्वास तांडेल,प्रतीक कडू,भूषण कडू,संदीप तांडेल,दिनेश ठाकूर,विद्याधर ठाकूर नरेश तांडेल.डि.के.कडू, सुजाता कडू.शंकर तांडेल,मंगेश तांडेल,अंकुश तांडेल. यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती