सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

युट्यूब मालिकेमुळे कलाविश्वाला एक नवीन व्यासपीठ मिळेल - मेघराज राजेभोसले

गजानन मेनकुदळे    03-02-2026 11:02:15

पुणे : चित्रपट, ओटीटी  आणि टीव्ही या तीनही माध्यमांचा आपला प्रेक्षक वर्ग , आर्थिक गणित वेगवेगळे आहे. अनेकांना मालिका करायच्या आहेत मात्र टीव्हीच्या मर्यादा लक्षात घेता सर्वांना संधि मिळतेच असे नाही. आज मराठी मनोरंजन विश्व एक नवीन सुरुवात करत आहे ते म्हणजे युट्यूब मालिका, तुझ्याचसाठी - एक मन विखुरलेलं  या मालिकेमुळे मराठी कलाविश्वाला नवीन व्यासपीठ मिळेल असा विश्वास अखिल भारतिय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केला. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित कार्यक्रमात 'तुझ्याचसाठी - एक मन विखुरलेलं; या पहिल्या मराठी यूट्यूब मालिकेचा लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न झाला, यावेळी राजेभोसले बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, या वेबमालिकेचे निर्माते सर्जेराव   गायकवाड आणि राम अश्रुजी पाटील , दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. 

पुढे बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, आपल्याकडे गुणवंत कलाकार अनेक आहेत , माध्यमांच्या मर्यादेमुळे सर्वाना संधि मिळत नाही या मालिकेच्या निमित्ताने एक नवीन व्यासपीठ कलाकारांना मिळेल, या मालिकेचे निर्माते त्यांचे आर्थिक गणीतही जुळवतील कारण निर्मात्याला त्यांचे पैसे रिटर्न मिळणे अत्यंत महत्वाचे असते. नव्या माध्यमावर ही संपूर्ण टीम मेहनत घेत आहे त्यांना निश्चित यश मिळेल, तसेच मालिकेच्या संकल्पनेचे कौतुक करत, मराठी डिजिटल माध्यमांसाठी ही मालिका मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी साजन बेंद्रे, सचिन गवळी, सर्जेराव  गायकवाड, राम पाटील आणि दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे  यांनी आपल्या मनोगतातून मालिकेच्या निर्मिती मागील भूमिका विषाद केली. 'तुझ्याचसाठी - एक मन विखुरलेलं' ही पहिली यूट्यूब मालिका येत्या 9 फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केले.


 Give Feedback



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती