सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 क्राईम

नांदेडमध्ये धक्कादायक घटना; सात वर्षांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी वडिलांना अटक

डिजिटल पुणे    03-02-2026 12:37:12

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात वर्षांच्या चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी तिच्याच वडिलांना तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पांडुरंग कोंडामंगले (३२) हा केरूर गावातील रहिवासी असून बाऱ्हाळी येथे सलून चालवतो. काही दिवसांपूर्वी त्याने मुलीला सोबत घेऊन बाहेर जाण्याचे सांगितले होते. त्यानंतर तेलंगणा हद्दीत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला, ज्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. संशय बळावल्याने तेलंगणा पोलिसांनी मुखेड येथे येऊन आरोपीला अटक केली.

या प्रकरणामागे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारीशी संबंधित नियमांचा संबंध असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. महाराष्ट्रात तीनपेक्षा जास्त अपत्ये असलेल्या व्यक्तीला सरपंचपदाची निवडणूक लढवता येत नाही, आणि आरोपीला तीन मुले असल्याने ही बाब अडथळा ठरू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.त्याचबरोबर आर्थिक अडचणी हेही संभाव्य कारण असल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तरीही ठोस निष्कर्ष काढण्याआधी पोलिस तपास पूर्ण होणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.सध्या पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून, चौकशीतून पुढे काय समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती