सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

पुण्याच्या महापौरपदी मंजूषा नागपुरे; अजितदादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीनं पाळला, आता पुणे महानगरपालिकेत महिलाराज

डिजिटल पुणे    03-02-2026 13:15:35

पुणे: पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी  भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली होती. सिंहगड रोडला प्रथमच महापौर पदाचा मान मिळाला आहे. नागपुरे सलग तिसऱ्यांदा नगरसेवकपदी विराजमान झाल्या आहेत, यंदाच्या निवडणुकीतही त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली. देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा

आज पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी बैठकीत या नवांची घोषणा केली आहे. तसेच आता पुण्याच्या महापौर व उपमहापौर निवडीनंतर फटाके उडवू नका, गुलाल उडवू नका,  अशा सूचना भाजपाकडून सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत.कुठल्याही पद्धतीचे बॅनर किंवा फटाके लावू नका. अजित पवारांच्या निधनानंतर भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिल्या आहेत.

भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले

महापौरपदासाठी रंजना टिळेकर, वर्षा तापकीर आणि मानसी देशपांडे यांच्या नावांची चर्चा होती. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत, पुणे पालिकेच भाजपची एकहात्ती सत्ता आली आहे. पुण्याचे महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव झाले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिली होती. 119 महिलांना संधी दिली होती. त्यापैकी 50 पेक्षा अधिक महिला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

अजित दादांनी दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार

पुणे महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढली गेली.देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होईल असे ठरले होते. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवार दिला जाणार नाही, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

पुणे महापालिका निकाल 

एकूण जागा १६५ 

भाजप- ११९

शिवसेना -० 

ऊबाठा-१ 

राष्ट्रवादी शरद पवार -३

राष्ट्रवादी अजित पवार -२७ 

काँग्रेस -१५ 

एमआयएम-० 

अपक्ष-०


 Give Feedback



 जाहिराती