छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या आहिल्यानगर रोडवर सोमवारी मध्यरात्री भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात एका रिक्षाचा गंभीर नुकसान झाले असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर रिक्षाचालक वाहनात अडकून पडला होता. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी तात्काळ पोहोचून बचावकार्य करत चालकाला बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातात रिक्षाचालक रईस हासिम शेख (अंदाजे 35, रा. रांजणगाव) आणि प्रवासी रुक्मिणी येणगे (अंदाजे 45) यांचा मृत्यू झाला. तर शितल मोरे (24) आणि पायल वरदे (19, रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव, वाळूज MIDC) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.