पुणे : पुण्यातील सैय्यद नगर भागात सेकंड-हँड दुचाकी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खरेदीदार असल्याचे भासवून आलेल्या एका व्यक्तीने टेस्ट रायडच्या बहाण्याने मोटारसायकल नेली आणि परत न येता पसार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्याने संबंधित दुचाकी 1 लाख 40 हजार रुपयांना विकण्याचे निश्चित केले होते. आरोपीने “थोडी टेस्ट रायड करून येतो” असे सांगून वाहन ताब्यात घेतले; मात्र बराच वेळ उलटूनही तो परतला नाही. त्यामुळे व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.कळेपडळ पोलिस ठाण्यात या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयिताचा शोध सुरू आहे.