सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 विश्लेषण

अजित पवारांच्या अस्थिकलशाचे बीडमध्ये गोदावरीत विसर्जन; त्यांच्याच मर्सिडीजमधून शेवटचा प्रवास

डिजिटल पुणे    04-02-2026 18:10:11

बीड: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर विविध ठिकाणी त्यांच्या अस्थींचे विधीपूर्वक विसर्जन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीत त्यांचा अस्थिकलश विसर्जित करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, अजित पवार बीड दौऱ्यावर येताना ज्या मर्सिडीज कारमधून प्रवास करायचे, त्याच वाहनातून त्यांचा अस्थिकलश विसर्जनस्थळी नेण्यात आला.

सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते व नागरिकांसाठी अस्थिदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके तसेच माजी आमदार आणि मोठ्या संख्येने पक्षकार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर शनी मंदिर परिसरातील गोदावरी नदीकाठी विधी पार पाडून अस्थी विसर्जन करण्यात आले. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तयार करण्यात आलेला ऑडिओ संदेश वाजवण्यात आला, ज्यामुळे वातावरण अधिकच भावूक झाले.

अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीकडे येताना विमान अपघातात निधन झाले होते. २९ जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.


 Give Feedback



 जाहिराती