सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 क्राईम

सोलापुरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; धर्मांतर व जबरदस्तीच्या लग्नप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

डिजिटल पुणे    05-02-2026 11:52:25

सोलापूर : शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला बळजबरीने धर्मांतरित करत लग्न लावल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाने पीडित मुलीचा माग काढून तिचे खासगी फोटो व व्हिडिओ मिळवले आणि त्याआधारे तिला धमकावले. त्यानंतर तिला वेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आला. पुढे लग्नाचे आमिष दाखवून तिला शहर काझी कार्यालयात नेण्यात आले, जिथे धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखवून कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्याचा आरोप आहे.

यानंतर पीडितेला काही काळ कर्नाटकातील कलबुर्गी येथे ठेवण्यात आले, जिथे तिचा छळ करण्यात आल्याची तक्रार तिने पोलिसांकडे केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती