उरण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही केवळ उमेदवार निवडण्याची नसून परिसराच्या विकासाची, मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे.भारतीय जनता पार्टीकडून नवघर जिल्हा परिषद श्रीमती प्रभावती भोईर, भेंडखळ पंचायत समिती मधून मिलिंद पाटील तर नवघर पंचायत समिती साठी उभे असलेले उमेदवार हरेश शेठ भोईरहे तिन्ही कर्तव्यदक्ष उमेदवार आमदार महेश शेठ बालदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत आहेत.विजय विकास सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.गोरगरिबांना मदत, युवकांना प्रोत्साहन, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे.संस्थेचे अध्यक्ष मार्गदर्शक विजय भोईर यांनी बांधकाम व आरोग्य सभापती म्हणून केलेली प्रामाणिक सेवा सर्वांना परिचित आहे. आज गरज आहे ती अनुभव, काम आणि विश्वास असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे.“जिथे विश्वास तिथे विकास” “आजचा योग्य मतदान, उद्याचा उज्ज्वल भविष्य” म्हणूनच,या उमेदवारांना जनतेचा पाठिंबा वाढला असून हे उमेदवार बहुमताने निवडून येतील अशी चर्चा जनतेतून सुरु आहे.