सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 क्राईम

गाझियाबादमधील तीन बहिणींचा मृत्यू; ‘कोरियन वेड’ आणि मोबाईल वाद ठरला कारण

डिजिटल पुणे    05-02-2026 18:17:53

गाझियाबाद: गाझियाबादमध्ये तीन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, अतिवापरात आलेला मोबाईल, ऑनलाइन गेम्स आणि कोरियन संस्कृतीचे आकर्षण यामुळे त्या वास्तवापासून दूर जात होत्या. घरगुती वादानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

मृत मुलींची नावे निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) अशी आहेत. पोलिसांना त्यांच्या खोलीतून एक डायरी सापडली असून, त्यात त्यांनी स्वतःला “भारतीय नव्हे तर कोरियन” समजत असल्याचे लिहिले होते. त्या कोरियन भाषा शिकत होत्या, कोरियन कपडे वापरत होत्या आणि घरीही आपापसात कोरियन भाषेत बोलत होत्या.

कोविडनंतर बदललेले जग

कोविड काळात शाळा बंद असताना तिघींनी मोबाईलवर कोरियन चित्रपट, वेबसीरिज आणि संगीत पाहायला सुरुवात केली. हळूहळू त्या या संस्कृतीत इतक्या गुंतल्या की वास्तव जगाशी त्यांचा संपर्क कमी होत गेला. त्यांनी कोरियन कंटेंटवर आधारित एक YouTube चॅनेलही सुरू केले होते.

अभ्यासाकडे दुर्लक्ष

अतिवापरामुळे तिघींचा अभ्यास ढासळला. शाळेत त्यांची कामगिरी खालावली आणि त्या नापास होऊ लागल्या. अखेरीस त्यांनी शाळेत जाणेही बंद केले. घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने वडील त्यांना खासगी शिकवणी देऊ शकत नव्हते.

वडिलांशी वाढलेला तणाव

मोबाईलच्या अति वापरावरून वडील चेतन यांनी त्यांना फटकारले आणि त्यांचे फोन काढून घेतले. यामुळे मुली अधिकच अबोल झाल्या. त्यांनी धाकट्या चार वर्षांच्या बहिणीशीही बोलणे बंद केले.

पोलिसांचा तपास

पोलिसांनी घरातील लोकांचे जबाब नोंदवले असून, डायरीतील नोंदींचाही अभ्यास सुरू आहे. ऑनलाइन व्यसन, मानसिक ताण आणि कौटुंबिक वाद यांचा एकत्रित परिणाम या घटनेमागे असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.तपास सुरू असून, पोलिस या प्रकरणातील सर्व पैलू तपासत आहेत.


 Give Feedback



 जाहिराती