सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

बारामतीत पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार का? रोहित पवारांचं मोठं विधान

डिजिटल पुणे    07-02-2026 11:57:16

बारामती : संपूर्ण पवार कुटुंब एकत्र यावं, ही अजित पवार यांची मनापासूनची इच्छा होती. त्यांच्या जागी दुसरं कोणीही येऊ शकत नाही, मात्र कुटुंबातील सदस्य म्हणून मी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अजितदादांना पाहतो, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

रोहित पवार म्हणाले की, अजितदादांचं स्वप्न होतं की पवार कुटुंबातील सर्व सदस्यांनी राजकारणापलीकडे जाऊन एकत्र राहावं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सध्या कुटुंबातील सदस्य एकत्र दिसत आहेत. दुर्दैवी घटनेनंतर गेल्या १३ दिवसांपासून पवार कुटुंब एकत्र आहे. याचाच भाग म्हणून काटेवाडी येथे श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी एकत्र मतदान केलं.काल शरद पवार यांनी कुटुंबातील सदस्यांना भावनिक मार्गदर्शन केलं. अजित पवार यांच्या स्मरणार्थ भविष्यात काही उपक्रम राबवण्याबाबत चर्चा झाली, असंही रोहित पवार यांनी सांगितलं.

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार यांनी थेट भाष्य टाळलं. मात्र १० फेब्रुवारी रोजी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही शंका उपस्थित करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच १२ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या प्रस्तावित विलीनीकरणाबाबत नेमकं काय ठरलं होतं, हे जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता, त्यामुळे आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झाली नव्हती. आता या धक्क्यातून सावरल्यानंतर ९ तारखेनंतर राजकीय निर्णयांवर चर्चा सुरू होईल.


 Give Feedback



 जाहिराती