सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 शहर

भारतीय विद्या भवन येथे १४ फेब्रुवारी रोजी 'स्वतंत्रते भगवती ' राष्ट्रभक्तीपर रचनांचा कार्यक्रम

डिजिटल पुणे    09-02-2026 12:42:47

पुणे  : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता 'स्वतंत्रते भगवती' हा विशेष अभंग गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सादर होणारा हा कार्यक्रम भारतभूमीचा गौरव करणाऱ्या राष्ट्रभक्तीपर रचनांवर आधारित आहे.
या कार्यक्रमात  गायिका माधवी नानल या रचनांचे सादरीकरण करणार असून तबल्यावर अरविंद परांजपे, हार्मोनियमवर उपेंद्र सहस्रबुद्धे आणि निवेदनाची जबाबदारी विराज सवाई सांभाळणार आहेत. 
हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता), पुणे येथे होणार असून कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित हा २८० वा कार्यक्रम असल्याची माहिती भारतीय विद्या भवन  चे सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती