सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

शरद पवार यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट; डॉक्टरांची महत्त्वाची माहिती

डिजिटल पुणे    09-02-2026 17:33:18

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. आज सकाळी डॉक्टरांची टीम बारामतीतील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी जाऊन प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात आणण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

रोहित पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. “पवार साहेबांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कारण नाही. त्यांना थोडासा कफ झाला असून खबरदारी म्हणून दोन-तीन दिवस रुग्णालयात ठेवले जाईल. ते आयसीयूमध्ये नसून खाजगी रूममध्ये आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर अभिजीत लोढा यांची माहिती

शरद पवार यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर अभिजीत लोढा यांनी सांगितले की, शारीरिक श्रमामुळे छातीत कफ झाला आहे. आवश्यक सर्व तपासण्या करण्यात आल्या असून उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तपासणीचे सविस्तर अहवाल आल्यानंतर उपचारांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पवार साहेबांना त्रास जाणवत होता, मात्र आता ते व्यवस्थित बोलत असून त्यांची तब्येत सुधारत आहे. सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही.


 Give Feedback



 जाहिराती