सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 राजकारण

मावळमध्ये राष्ट्रवादीचा दबदबा कायम; , अजितदादांची आठवण येताच सुनील शेळके भावूक

डिजिटल पुणे    09-02-2026 17:49:35

पुणे : मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठं यश मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. जिल्हा परिषदेच्या पाचही जागा आणि पंचायत समितीच्या सर्व दहा जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे मावळमध्ये राष्ट्रवादी हा प्रभावी राजकीय घटक ठरल्याचं स्पष्ट झालं आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे आभार मानले, मात्र अजित पवार यांची आठवण काढताना ते भावूक झाले. “अजितदादा असते तर आजचा हा विजय आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात साजरा केला असता. कठीण काळातही मावळच्या जनतेने राष्ट्रवादीवर विश्वास दाखवला,” असं त्यांनी सांगितलं. मावळच्या विकासासाठी अजित पवार यांनी मोठा निधी मंजूर करून अनेक कामांना चालना दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे विनायक मासाळ विजयी झाले. त्यांची उमेदवारी स्वतः अजित पवार यांनी जाहीर केली होती. विजय मिळाल्यानंतर मासाळ यांनीही अजित पवार यांची उणीव प्रकर्षाने जाणवत असल्याची भावना व्यक्त केली.या निकालामुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे.


 Give Feedback



 जाहिराती