पुणे : पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते ओंकार (मनोज) शेडजाळे यांनी पुणे महानगरपालिकेत माजी नगरसेवक श्री जयंत भावे (भावे काका) यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. ओंकार शेडजाळे हे राज्यसभा खासदार मेधाताई कुलकर्णी यांचे कार्यकर्ते मानले जातात.
श्री जयंत भावे यांना पुणे महानगरपालिकेच्या कामाचा अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि तत्परतेने पार पाडल्या आहेत. पक्षासाठी त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची संघटनात्मक भूमिका नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे.
नुकतेच निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना आज अनुभवी आणि मार्गदर्शक नेतृत्वाची गरज आहे. अशा वेळी माजी नगरसेवक श्री जयंत भावे यांचे मार्गदर्शन नवीन नगरसेवकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत ओंकार शेडजाळे यांनी व्यक्त केले.
महानगरपालिकेच्या कामाचा बऱ्याच वर्षाचा अनुभव भारतीय जनता पार्टीने ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या अतिशय प्रामाणिकपणे अगदी तत्परतेने त्यांनी त्या पार पाडल्या भारतीय जनता पार्टीचे नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांना आज माजी नगरसेवक श्री जयंत भावे यांच्या मार्गदर्शनाची गरज असणार आहे पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज न होता ते पक्षाचेच काम करत राहिले म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठींना एक विनंती आहेश्री जयंतजी भावेकाका यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घ्यावे ही नम्र विनंती.
विशेष म्हणजे, पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतरही श्री जयंत भावे यांनी कोणतीही नाराजी न दाखवता पक्षाशी एकनिष्ठ राहून भारतीय जनता पार्टीचे काम सुरूच ठेवले. पक्षाशी असलेली ही निष्ठा आणि समर्पण लक्षात घेता त्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी विनंती शेडजाळे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना केली आहे.श्री जयंतजी भावे काका यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिल्यास पुणे महानगरपालिकेच्या कामकाजात अनुभव, सातत्य आणि शिस्त यांचा सकारात्मक लाभ होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.