छत्रपती संभाजीनगर — छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक नियमानुसार व शांततेत पार पडली. या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांनी पिठासन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
निवड प्रक्रियेदरम्यान सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि प्रशासनाच्या प्रभावी देखरेखीखाली पार पडली. उपस्थित नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने निवडणूक सुरळीतपणे पूर्ण झाली.
या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी (भा.प्र.से.) यांनी दाखवलेले नेतृत्व, प्रशासनिक कौशल्य आणि वेळेचे अचूक नियोजन विशेष उल्लेखनीय ठरले. त्यांच्या शांत, संयमी व निष्पक्ष कार्यपद्धतीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक झाली. जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी प्रत्येक टप्प्यावर दक्षता घेतली गेली.