सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

सिंधुदुर्गात पर्यटन विकासाला चालना; फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाला गती द्यावी – मंत्री नितेश राणे

डिजिटल पुणे    13-02-2026 14:47:39

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली.  यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.

यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटन विकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.


 Give Feedback



 जाहिराती