सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 जिल्हा

रायगडचा खरा डॉन महेंद्रशेठ घरत : श्रीरंग बर्गे

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    14-02-2026 17:23:03

उरण :,"रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तेचा व पैशांचा प्रचंड वापर करणाऱ्या महायुतीच्या झंझावातासमोर भलेभले धाराशाही झाले असताना काँग्रेसने लढलेल्या ३ पैकी २ जागा जिल्हा परिषदेवर प्रचंड बहुमताने जिंकून काँग्रेसचा झेंडा फडकविला. त्यामुळे  कामगार नेते तथा जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हेच खरे डॉन आहेत. कॉंग्रेसमध्ये मंत्री, आमदार, खासदार झाल्यानंतर अनेकांनी कॉंग्रेसलाच सोडचिठ्ठी दिली; परंतु कॉंग्रेसशी निष्ठावंत राहून महेंद्रशेठ रायगडची खिंड लढवत आहेत, हे निश्चितच कौतुकास्पद आहे," असे प्रतिपादन श्रीरंग बर्गे यांनी अलिबाग येथे केले. ते 'अलिशान कप'च्या उदघाटनप्रसंगी अलिबाग-सोगाव येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले, "महाविकास आघाडीचे नेतृत्व करताना आपल्या चाणक्य नीतीने ऐनवेळी भावना घाणेकर यांना उमेदवारी जाहीर करून उरणचे आमदार महेश बालदी यांना 'पळता भूई थोडी केली' व उरण नगर परिषदेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून महेश बालदी यांच्यावर मात करत त्यांची घमेंड उतरविली.
 
तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मोट बांधत स्वतः माघार घेऊन काँग्रेसच्या वाट्याच्या तीन जागा शिवसेना, शेकापला सोडून पुढची रणनीती आखली. उरण मतदारसंघाचा ट्रेंड ठरविणाऱ्या उरण पंचायत समितीवर ७.१ असे घवघवीत यश संपादन करून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी २०२९ ची आमदार महेश बालदी यांची वाट बिकट केली आहे, किंबहुना विधानसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा केला आहे. चिरनेर, जासई जि. प. मतदारसंघात तरुण तडफदार उमेदवारांना उमेदवारी देऊन युवकांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे, हे तरुणाईला दाखवून दिले."
 
रायगडमध्ये कॉंग्रेसने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तीन जागा लढविल्या आणि दोन जागा जिंकल्या. रायगड हा मतदारसंघ दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले आणि दिवंगत आमदार मधुकर ठाकूर यांचा आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांत काँग्रेसची पीछेहाट झाली आहे, अशावेळी रायगडमधील यश निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. त्यामुळे रायगडमध्ये आम्ही काँग्रेसची शान राखली, असे अभिमानाने म्हणू शकतो," असे काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत अलिबाग-सोगाव येथे म्हणाले. त्यांच्या हस्ते प्रकाश झोतात आयोजित केलेल्या 'अलिशान कप'चे उदघाटन झोकात झाले. अखंडपणे सोगावमध्ये सलग १३ वर्षे क्रिकेट सामने भरवून येथील तरुणांनी  आपल्यातली जिद्द दाखविली आहे. 
 
यावेळी ते पुढे म्हणाले, "क्रिकेटचा मी चाहता आहे. मी फक्त क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करत नाही, तर गावोगावी मैदाने मिळवून देतोय, अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर यांच्या नावाने हक्काचे मैदान हवे. राजाभाऊ ठाकूर यांच्या पराभवामुळे आमचा 'गड आला, पण सिंह गेला' असे मला वाटते. बॅरिस्टर अंतुले साहेब यांच्या विचारांची कास धरून रायगड आपल्याला पुन्हा  कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांनी आतापासूनच पुढची तयारी सुरू करावी."  
 
राजाभाऊ ठाकूर म्हणाले, "मी खचलेलो नाही, मॅच फिक्सिंग झाली. फिल्डिंगमध्ये कमी पडलो, परंतु मी शेवटपर्यंत लढणारच आहे. ठाकूर घराण्याची मान उंचावणारच."सुनील थळे म्हणाले, "हार-जित होते, शिस्तप्रियता हवी, येत्या काळात राजाभाऊ निश्चितच त्यांचा करिष्मा दाखवतील."यावेळी एसटी कॉंग्रेसचे श्रीरंग बर्गे, काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, राजाभाऊ ठाकूर, ऍड.प्रवीण ठाकूर, सुनील थळे, रवींद्र ठाकूर, ऍड.उमेश ठाकूर, नगरसेवक समीर ठाकूर, माजी सरपंच जगन्नाथ पेडवी, माजी उपसरपंच अशोक नाईक, अनिल जाधव, विलास गायकवाड, अनिता शिंदे, सानिका घाडी आदी उपस्थित होते. यावेळी अवघ्या पाच वर्षांच्या शिवांश याने लाठीकाठी स्पर्धेची चमक प्रेक्षकांसमोर दाखवून क्रीडाप्रेमींची मने जिंकली. त्याची इंडोनेशिया येथे लाठीकाठी स्पर्धेसाठी निवड झाल्याने, तसेच ९१ वर्षांच्या कुतुबुद्दीन कप्तान यांचा सत्कार महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आला.


 Give Feedback



 जाहिराती