सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 शहर

विश्वगुरु भारतासाठी ७५० तरुण शांतीदूत म्हणून सज्ज! रोटरीच्या शांतता आणि पर्यावरण परिषदेस चांगला प्रतिसाद; युवकांनी जागतिक नेतृत्व करण्याचे आवाहन

डिजिटल पुणे    16-02-2026 10:40:50

पुणे : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित 'शाश्वत पर्यावरण आणि शांतता परिषद' उत्साहात पार पडली. परिषदेत राज्यातील ७५० हून अधिक निवडक तरुणांना शांतीदूत म्हणून सन्मानित करण्यात आले आणि त्यांनी शाश्वत पर्यावरण आणि शांतीसाठी शपथ घेतली.बालगंधर्व रंगमंदिर येथे १२ जानेवारी २०२६ रोजी ही परिषद उत्साहात पार पडली .या उपक्रमाची संकल्पना रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ च्या माजी अध्यक्ष दीप्ती पुजारी यांची होती.या प्रकल्पाला प्रांतपाल संतोष मराठे , विजा रायकर यांचा पाठिंबा तसेच माजी प्रांतपाल रवी धोत्रे यांचे सहकार्य लाभले.परिषदेत माजी प्रांतपाल मंजू फडके आणि सर्व उपस्थित रोटरी अध्यक्षांचा हस्ते शांतीदूतांचा गौरव करण्यात आला. डॉ. गुरुदास नुलकर, श्रीमती नॅन्सी कात्याल आणि डॉ. शिरीष लिमये यांनी तरुणांना शाश्वत विकास, अहिंसक संवाद आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले.या उपक्रमासाठी रोटरी क्लब पूना नॉर्थसह निगडी-पुणे, पाषाण, स्पोर्ट्स सिटी, हिलसाइड, पुणे वेस्ट आणि एकूण २६ रोटरी क्लबचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दीप्ती पुजारी, नीलम बेंडे यांनी केले.

महाराष्ट्रातील २५० हून अधिक शाळा व महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारदर्शक प्रक्रियेद्वारे ७५० हून अधिक युवा प्रतिनिधींची निवड करण्यात आली. प्रकल्प अधिकारी मोहन पुजारी यांनी निवड प्रक्रियेचे नियोजन केले.महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. I,उपायुक्त पर्यावरण विभाग किशोरी शिंदे आणि पर्यावरण अधिकारी गणेश सोनुने यांनी प्रशासकीय व तांत्रिक सहकार्य दिले. केशव मनगे , विवेक जैन, डॉ उमेश फलक, स्मिता विखाणकर, संतोष चिपळूणकर, प्राजक्ता जेरे, सुश्रुत सरदेसाई, सरिता गोयंका आणि रोटरीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.भारताला पुन्हा विश्वगुरु म्हणून प्रस्थापित करण्यासाठी युवकांनी आंतरराष्ट्रीय तत्वज्ञान ऑलिम्पियाडसारख्या जागतिक व्यासपीठावर नेतृत्व करावे, हा उद्देश होता.

 


 Give Feedback



 जाहिराती