सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 विश्लेषण

उरण नगर परिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांचे, जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    16-02-2026 10:43:57

उरण :  उरण नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून दलीत, आदिवासी गोरगरीब कंत्राटी सफाई कामगार कार्यरत आहेत. या कामगारांनी आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे आमरण उपोषण सुरु केले आहे.उरण शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे. कमी कामगार कामावर ठेऊन काम करून घेऊन अधिक नफा मिळविण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आणि त्यावर नगरपरिषद प्रशासनाचे मौन बाळगल्यामूळे उपोषण सुरु असून उपोषणाचा दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तिसरा दिवस आहे.तिसऱ्या दिवशीही आमरण उपोषण करूनही न्याय न मिळाल्याने कामगार वर्गानी, उपोषण कर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर कामगारांना न्याय मिळावा अशी माफक अपेक्षा उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली आहे.कंत्राटी सफाई कामगारांना तात्काळ रूजू करून घेणे.मागील में. भाग्यदिप वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीने तीन वर्षे नियमानुसार पीएफ भरलेला नाही. २ वर्षांचा बोनस दिलेला नाही. मृत कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना ईएसआयसी योजनेचा लाभ मिळालेला नाही. में. समिक्षा एंटरप्राईजेस या नवीन ठेकेदाराने ५ महिन्यांचा पीएफ भरलेला नाही. में.  समिक्षा एंटरप्राईजेस या कंपनीने कामगारांना ईएसआयसी या योजनेचे कार्ड दिलेले नाही.हा सर्व अन्याय कामगारावर होत आहे तो दूर व्हावा या अनुषंगाने अध्यक्ष ऍड सुरेश ठाकूर,कार्याध्यक्ष संतोष पवार, सरचिटणीस अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषद मधील कचरा साफ सफाई कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
 
उरण नगरपरिषद हद्दीतील कचरा उचलण्याचा कॉन्ट्रॅक करार वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात येते कि मे. समिक्षा एंटरप्राईजेस ही कंपनी प्रचंड नफा कमवत असताना उरण नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.कराराचा पूर्णतः भंग होत आहे.नगरपालीका प्रशासन या बाबतीत गप्प का आहे हा एक संशोधनाचा भाग आहे.उपोषण कर्त्यांना त्वरित न्याय मिळावा ही कामगार वर्ग, उपोषण कर्त्यांची मागणी आहे.
   - संतोष पवार, कामगार नेते.
 
 


 Give Feedback



 जाहिराती