सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 जिल्हा

साताऱ्याचे चित्रकार रुतिक कुंभार यांची मान्यवरांना कलाकृती भेट ; ‘उद्योगबोध’ कार्यक्रमात उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग

डिजिटल पुणे    16-02-2026 12:14:01

मुंबई – १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दि ललित हॉटेल, मुंबई येथे मराठी उद्योजकांना एकत्र आणून जागतिक स्तरावर प्रगतीची दिशा देणाऱ्या सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित ‘उद्योगबोध’ हा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. “एक मेका सहाय करू, अवघे होऊ श्रीमंत” या ब्रीदवाक्याखाली आयोजित कार्यक्रमास देशभरातून तसेच दुबईहून मोठ्या संख्येने उद्योजकांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे नेतृत्व अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक डुगाडे, विश्वस्त अजित मराठे, विश्वस्त रवींद्र प्रभुदेसाई, सरचिटणीस सुहास फडणीस तसेच उपसरचिटणीस केदार साखरे, सुभाष गोरे, अमोल कासार आणि प्रज्ञा बापट यांनी केले. सूत्रसंचालन किरण खोत यांनी केले. विविध पथकांच्या माध्यमातून कार्यक्रमाची उत्कृष्ट आखणी करण्यात आली.

या सोहळ्यात साताऱ्याचे चित्रकार रुतिक कुंभार (आर. के. आर्ट स्टुडिओ) यांनी स्वतःच्या हस्ते साकारलेली रेखाचित्रे मान्यवरांना भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधले. सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ, विको कंपनीचे संजीव पेंढारकर, उद्योजिका वंदना धनंजय दातार, संयुक्त अरब अमिरातीतील व्यावसायिक तज्ज्ञ अब्दुल्ला मोहम्मद अल अब्दुल्ला तसेच अभिनेते सुबोध भावे, सारंग साठे आणि संदीप कुलकर्णी यांना रेखाचित्रे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक मार्गदर्शन, उद्योजकांना मिळणाऱ्या शासकीय योजनांची माहिती, गुंतवणूकदार प्रतिकृती सादरीकरण फेरीमधील गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन, प्रभुदेसाई सर यांचे आध्यात्मिक सादरीकरण तसेच अविनाश गोखले सर यांचे आंतरराष्ट्रीय व्यवसाय विस्ताराविषयी मार्गदर्शन अशी विविध सत्रे पार पडली. उद्घाटन व प्रेरणादायी भाषण दीपक घैसास (भारत संचालन प्रमुख व मुख्य वित्त अधिकारी, आय-फ्लेक्स सोल्यूशन्स लिमिटेड) यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता उद्योजकांच्या व्यवसाय देवाण-घेवाण सत्राने झाली. या सत्रात परस्पर सहकार्य, नव्या व्यावसायिक संधी आणि भविष्यातील प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.या सर्व सत्रांमुळे उपस्थित उद्योजकांना नवी दिशा व प्रेरणा मिळाली. ‘उद्योगबोध’ हा कार्यक्रम केवळ व्यावसायिक नव्हे तर वैचारिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावा ठरला.


 Give Feedback



 जाहिराती