सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 क्राईम

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये छापेमारी, 4 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, 6 जणांना अटक

डिजिटल पुणे    16-02-2026 17:29:10

पुणे : शहरातील अमली पदार्थांच्या जाळ्यावर कारवाई करताना पुणे पोलिसांनी थेट जोधपूर येथे धाड टाकून सुमारे ४ कोटी रुपयांच्या एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी पुणे येथील खराडी परिसरात पोलिसांनी १२ लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम एमडी जप्त केले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असता या रॅकेटचे धागेदोरे थेट राजस्थानपर्यंत पोहोचत असल्याचे निष्पन्न झाले.

तपासाच्या आधारे पोलिसांचे विशेष पथक राजस्थानमध्ये दाखल झाले. जोधपूर येथे छापेमारी करत या टोळीचा प्रमुख रामकरण जाट याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्यात आले.

दरम्यान, पुण्यातही विविध ठिकाणी छापे टाकून इतर आरोपींना अटक करण्यात आली. एकूण १ किलो ९६० ग्रॅम एमडी असा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. या अमली पदार्थांची विक्री नेमकी कुणाला करण्यात आली, तसेच पुरवठा साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सध्या सुरू आहे.या कारवाईमुळे पुणे आणि राजस्थानदरम्यान कार्यरत असलेल्या अमली पदार्थांच्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


 Give Feedback



 जाहिराती