सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मंत्रालय लाच प्रकरण! झिरवळांचे खाजगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त
  • अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांचेसोबत कसे वागला? रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न, विखे पाटलांचा थेट सवाल
  • : अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र
 क्राईम

बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई; ११ बांगलादेशी महिलांसह दलालांविरोधात गुन्हे दाखल

डिजिटल पुणे    18-02-2026 18:03:21

पुणे : पुणे शहरातील बुधवार पेठ येथील रेड लाईट परिसरात पोलिसांनी मध्यरात्री विशेष सर्च ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. या छापेमारीदरम्यान कुंटणखान्यांमध्ये असलेल्या महिलांची कागदपत्रे तपासण्यात आली असता ११ महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित महिलांवर तसेच कुंटणखाना चालवणारे आणि दलालांविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईत एकूण २२ महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी ११ महिला बांगलादेशातील असल्याचे आढळले. त्यांच्या भारतातील वास्तव्याबाबतची कागदपत्रे संशयास्पद असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आवश्यक ती पडताळणी पूर्ण करून संबंधित महिलांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याची कार्यवाही केली जाणार आहे.ही कारवाई फरासखाना पोलिस ठाणे हद्दीत खडक पोलिस यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः संबंधित ठिकाणी भेट देत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बुधवार पेठ परिसरातील बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले होते आणि त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. परिसरातील सर्व संशयित इमारतींची तपासणी केली जाणार असून अनधिकृत कृत्यांना मदत करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुसार पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, भारती विद्यापीठ परिसरात आढळलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणाबाबतही आयुक्तांनी माहिती दिली. या घटनेत सामूहिक अत्याचाराचा प्रकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून सहा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. प्राथमिक तपासात हा खुनाचा गुन्हा असल्याचे समोर आले आहे.पुणे पोलिसांकडून सुरू असलेल्या या मोहिमेमुळे बुधवार पेठ परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर आळा बसवण्याच्या दिशेने पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे.


 Give Feedback



 जाहिराती