सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! अजित दादांच्या निधनादिवशीच मंत्रालयात फाईलवर सह्या; राज्यभरातून संताप होताच मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
  • रोहित पवारांनी दिल्लीत खासगी गुप्तहेरांची भेट घेतली, दादांचा अपघात की घातपात, लवकरच सत्य समोर आणणार!
  • पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांत झटापट; जखमींची काळजी घेण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे निर्देश
 शहर

शिवजयंतीनिमित्त आझम कॅम्पस शैक्षणिक परिवारातर्फे अभिवादन ; पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय येथील पुतळ्याला पुष्पहार

डिजिटल पुणे    19-02-2026 13:58:29

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आझम कॅम्पस शैक्षणिक परिवारातील विविध शैक्षणिक संस्थांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमात महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ तसेच अवामी महाज सामाजिक संस्था  यांच्या वतीने सहभाग नोंदविण्यात आला.प्रा. इरफान शेख  प्रा. मुजफ्फर शेख , डॉ. नाझीम शेख ,अफझल खान. आसिफ शेख, डॉ. एम. ए. लाहोरी, धनंजय पालणे यांच्यासह आझम कॅम्पसअंतर्गत सर्व संस्थांचे प्राचार्य, संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि आदर्शांचा गौरव करत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमात राष्ट्रभक्तीपर वातावरणात शिवरायांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती