सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : फिनालेच्या 2 दिवस आधीच बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याचं नाव लिक? प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या
  • राज्यात पारा 44 अंशांच्या पार; पुढील तीन दिवस महत्त्वाचे, जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रतील चार शहर, उष्णतेने नागरिक हैराण
  • पुण्यात बेवारस वाहनांवर होणार कारवाई; २४ तासांत हटवा नाहीतर थेट होणार जप्त, वाहतूक पोलिसांची कारवाई सुरू
  • उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
  • महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना दीर्घकाळ परिणाम भोगावे लागतील, 33 टक्के महिलांना इथं येऊ द्यात: नरेंद्र मोदी
 DIGITAL PUNE NEWS

रितेश देशमुख साकारणार छत्रपती शिवाजी महाराज; ‘राजा शिवाजी’चे पोस्टर प्रदर्शित, १ मे रोजी चित्रपट प्रदर्शित

डिजिटल पुणे    19-02-2026 18:01:33

मुंबई : शिवजयंतीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या आगामी ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक चाहत्यांसमोर आणली आहे. सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पोस्टरमध्ये रितेश देशमुख समशेर हाती घेतलेल्या आणि तेजस्वी शिवरूपात दिसत असून, त्याचा हा लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. चाहत्यांकडून पोस्टरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.‘राजा शिवाजी’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील शौर्यगाथा आणि पराक्रम मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात साकारले जाणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुख करत आहे.

चित्रपटात रितेश देशमुखसोबत अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि जेनेलिया देशमुख यांसारखे नामांकित कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. दमदार कलाकारांची फळी आणि भव्य मांडणीमुळे चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.

निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी सांभाळली असून, संगीताची धुरा अजय–अतुल या सुप्रसिद्ध जोडीकडे आहे. त्यामुळे चित्रपटाच्या संगीताबाबतही मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.हा चित्रपट केवळ मराठीपुरता मर्यादित न राहता इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार असून, मराठी चित्रपटसृष्टीतील हा एक भव्य ‘पॅन इंडिया’ प्रकल्प मानला जात आहे.शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या पोस्टरमुळे ‘राजा शिवाजी’ची चर्चा रंगली असून, आता प्रेक्षकांना १ मेची प्रतीक्षा लागली आहे.


 Give Feedback



 जाहिराती