सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मंत्रालय लाच प्रकरण! झिरवळांचे खाजगी सचिव रामदास गाडेंवर कारवाई, अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त
  • अजित पवार जेव्हा हयात होते, तेव्हा तुम्ही त्यांचेसोबत कसे वागला? रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रश्न, विखे पाटलांचा थेट सवाल
  • : अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र
 जिल्हा

राज्याच्या श्रमिक बजेटमध्ये वाढ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

डिजिटल पुणे    20-02-2026 14:01:10

मुंबई : व्हीबी-जी रामजी (विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन हमी-ग्रामीण) योजनेंतर्गत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी हा निर्णय ग्रामीण विकास विभागाच्या उच्चाधिकार समितीत घेण्यात आला. केंद्र सरकारचे ग्रामीण विकास विभागाचे सचिव शैलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेत ही बैठक नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत महाराष्ट्राचे श्रमिक बजेट हे १३०० लाख मनुष्य दिवसावरुन १६०० लाख मनुष्य दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा महाराष्ट्राला फार मोठा लाभ मिळणार आहे. यातून ग्रामीण भागात अनेक रोजगार संधी निर्माण होणार असून, ग्रामीण पायाभूत सुविधांच्या कामांना सुद्धा बळकटी येईल. विशेषत: मजुरांची संख्या वाढणार असल्याने अकुशल कामगारांना त्याचा मोठा लाभ होईल. त्यामुळे या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती