सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कृष्णा आंधळे आत्तापर्यंत तीनवेळा गावी येऊन गेला; सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचा खळबळजनक दावा
  • नागपुरात बारावीच्या केमिस्ट्री-फिजिक्स पेपरफुटीचा संशय; व्हॉट्सअॅप ग्रुपमधून प्रश्नपत्रिका प्रसारित? तपासाला वेग
  • बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर बिष्णोई गँगचा मोर्चा राजकारण्यांकडे? काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी
  • पोलीस भरतीच्या स्वप्नावर पडलं विरजण! शारीरिक चाचणीवेळी धावताना तरुणाचा मृत्यू, छ. संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना
  • पोलीस अधिकाऱ्याने मागितली 35 हजारांची लाच, ACB ने रचला सापळा, पुण्यातील पौडमध्ये रंगेहात पकडलं
  • अजितदादांना नरेंद्र मोदी अन् अमित शाहाच न्याय देऊ शकतात, VSR नावाच्या कंपनीला खूप मोठ्या लोकांचा पाठिंबा,मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा घ्या; रोहित पवारांचा दिल्लीत एल्गार
 जिल्हा

कृष्णा आंधळे तिनदा गावी आल्याचा दावा; देशमुख कुटुंबाची अटकेची मागणी, पुढील सुनावणी 6 मार्चला

डिजिटल पुणे    21-02-2026 18:12:47

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा आतापर्यंत तीन वेळा आपल्या गावी येऊन गेल्याचा गंभीर आरोप दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात सीआयडीला माहिती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कृष्णा आंधळे मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याला पकडण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कारवाई करण्याची गरज असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले. तसेच कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करत आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली.

आज बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली. गेल्या दीड वर्षांपासून देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, आरोपी वाल्मिक कराड यांच्या जामीन अर्जावर 26 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यासाठी कॅव्हेट दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडणार असल्याचे देशमुख कुटुंबाने सांगितले.

सुनावणीत काय घडले?

आजच्या सुनावणीत न्यायालयाने सरकारी पक्षाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. आरोपी क्रमांक तीन ते सात यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्याच्या मागणीवर सरकारी पक्ष लेखी उत्तर सादर करणार आहे. विष्णू चाटे यांच्या जेल बदली अर्जावर आदेश येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आरोपी जयराम चाटे यांनी नवीन वकील एम. के. वाघीरकर यांची नियुक्ती केली आहे.

आरोपींच्या वकिलांकडून लॅपटॉपची क्लोन कॉपी, फॉरेन्सिक अहवाल आणि पेन ड्राईव्ह अद्याप न मिळाल्याची बाब न्यायालयात मांडण्यात आली. या कागदपत्रांशिवाय साक्षीदारांची यादी स्वीकारू नये, अशी मागणी बचाव पक्षाने केली. सरकारी पक्षाने दोषारोपपत्र पूर्ण स्वरूपात एकदाच दाखल करावे, अशीही विनंती करण्यात आली.या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. प्रकरणातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती