सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे, पुस्तकं झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे: राज ठाकरे
 शहर

यशदा, पुणेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथ साहित्य पुरस्कार सौ. सुमन चंद्रशेखर यांना प्रदान

डिजिटल पुणे    23-02-2026 14:44:09

पुणे  – यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी) आयोजित राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन २०२६ मध्ये ज्येष्ठ साहित्यिका सौ. सुमन चंद्रशेखर (बार्शी) यांना त्यांच्या “मायेची पाखर” या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा उत्कृष्ट ग्रंथ साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मराठी भाषा संवर्धन समिती संवाद, पुणे यांच्या सहकार्याने आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय संमेलनात प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला.यावेळी श्री. सुनील महाजन (संवाद, पुणे), सचिन ईटकर, शेखर गायकवाड, महेश भागवत तसेच संमेलनाध्यक्ष डॉ. किरण धांडे (प्रभारी प्रशासन अधिकारी) यांच्या हस्ते सौ. चंद्रशेखर यांचा गौरव करण्यात आला.

ऋत प्रकाशनने प्रकाशित केलेल्या “मायेची पाखर” या कादंबरीला वाचकांकडून आणि समीक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या सौ. सुमन चंद्रशेखर यांची आतापर्यंत आठ पुस्तके प्रकाशित झाली असून त्या विविध साहित्य चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत.या पुरस्कारामुळे त्यांच्या साहित्यिक कार्याला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून बार्शी शहराच्या साहित्यविश्वातही आनंदाचे वातावरण आहे.


 Give Feedback



 जाहिराती