सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
  • बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार
  • पुण्यात थकीत ई-चलनांवर कडक कारवाई; ३० दिवसांत दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार
  • मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले
  • जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे; बारामती पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
 राजकारण

पुण्यातील वाद चिघळला: “मी एक बुक्की दिली असती तर तो उठला नसता,” हनुमंत पवारांचा इशारा; दामगुडेंचा ‘कृत्यावर ठाम’ दावा

डिजिटल पुणे    25-02-2026 11:54:27

पुणे : एका वृत्तवाहिनीवरील चर्चेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे यांच्यातील वादाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.हनुमंत पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चर्चेनंतर दामगुडे आणि त्यांच्या काही साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. “मी शेतीत काम केलेला आणि गुरं राखलेला माणूस आहे. मी त्यादिवशी एक बुक्की दिली असती तर तो पुन्हा उठला नसता. मात्र मी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि गांधीवादी विचारांचा अनुयायी असल्याने हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही,” असे पवार यांनी म्हटले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणीही केली आहे.

दुसरीकडे, तुषार दामगुडे यांनी या घटनेबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले. “जे घडले ते योग्यच होते. काही वेळा ठाम भूमिका घ्यावी लागते,” असे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे कायदेशीर परवान्यासह शस्त्र असून सुरक्षेच्या कारणास्तव ते बाळगले जाते. पोलिसांनी शस्त्र आणि परवाना ताब्यात घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे. शहरातील राजकीय वातावरणात या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.


 Give Feedback



 जाहिराती