सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
  • बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार
  • पुण्यात थकीत ई-चलनांवर कडक कारवाई; ३० दिवसांत दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार
  • मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले
  • जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे; बारामती पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
 जिल्हा

बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार

डिजिटल पुणे    26-02-2026 11:52:41

बारामती :  बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या देत डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी तत्काळ एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार, राजेंद्र पवार तसेच वकिलांची टीम पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. जवळपास एक तास २५ मिनिटांहून अधिक काळ पोलिसांशी चर्चा सुरू होती. सर्व मुद्द्यांवर माहिती दिल्यानंतरही गुन्हा नोंदवला जात नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.

नेमकी मागणी काय?

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाची चौकशी सध्या सीबीआयकडे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) च्या अहवालात गंभीर निष्काळजीपणाचा उल्लेख असल्याचा दावा पवार समर्थकांनी केला आहे. विमानाच्या देखभालीत त्रुटी राहिल्यामुळे दुर्घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर डीजीसीए आणि संबंधित व्हीएसआर कंपनीविरोधात ‘क्रिमिनल नेग्लिजन्स’ अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रोहित पवार यांनी पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांनी कायदेशीर बाबींचा दाखला देत तत्काळ एफआयआर नोंदवणे शक्य नसल्याचे सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.

पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी

दरम्यान, बारामती पोलिस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते जमा झाले होते. घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.राजेंद्र पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, या प्रकरणातील सर्व माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर यावी. अहवाल सार्वजनिक करण्यात विलंब होत असल्याने लोकांच्या मनात शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच’

युगेंद्र पवार यांनी संबंधित कंपनीवर तातडीने गुन्हा दाखल करून सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पुन्हा एकदा केली. दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशाराही समर्थकांकडून देण्यात आला.दरम्यान, पोलिसांकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र कायदेशीर प्रक्रियेअंतर्गतच पुढील निर्णय घेतला जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.या संपूर्ण प्रकरणाकडे बारामतीसह राज्याचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती