सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
  • बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार
  • पुण्यात थकीत ई-चलनांवर कडक कारवाई; ३० दिवसांत दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार
  • मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले
  • जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे; बारामती पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
 विश्लेषण

बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; रोहित पवार राष्ट्रवादीची फौज घेऊन बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले, इकडे मरीन ड्राईव्ह पोलिसांचा एफआयआर बाबत महत्त्वाचा निर्णय

डिजिटल पुणे    26-02-2026 12:57:10

बारामती/मुंबई : आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) आणि VSR विमान कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भात त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज सादर केला होता.

मात्र, संबंधित प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडून (SIT), पुणे येथे सुरू असल्याने मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवार यांचा अर्ज पुढील कारवाईसाठी SIT कडे वर्ग केला आहे. याबाबत पोलिसांनी लेखी पत्र देत माहिती दिल्याचे समजते.

बारामतीतही गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न

दरम्यान, आज रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांनी DGCA व VSR कंपनीविरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाणे गाठले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक वकिलांची मोठी उपस्थिती होती.सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस तक्रार स्वीकारतील; मात्र तत्काळ FIR नोंदवण्याबाबत असमर्थता दर्शविली जाऊ शकते. त्यामुळे पुढील कायदेशीर पावले काय असतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी

बारामती पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात जबाबदारांवर गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकाही करण्यात आली.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात SIT च्या तपासानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार असून, राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती