उरण :रायगड जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), सर्पमित्र निसर्गसंवर्धन संस्था,चिरनेर-उरण संस्थेच्या वतीने नागरिकांना यावर्षी होळी सण पर्यावरणपूरक व वृक्षमैत्री ने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जनजागृती संदेशात नमूद करण्यात आले आहे की, होळी हा आनंद, एकात्मता आणि निसर्गाशी नाते दृढ करणारा सण असला तरी सण साजरा करताना झाडांची तोड, रासायनिक रंगांचा वापर आणि पाण्याची उधळपट्टी यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरण, झाडे व पक्ष्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.
होळी संदर्भातील मार्गदर्शक सूचना :संस्थेने जिवंत झाडांची तोड न करण्याचे आवाहन केले आहे. होळी पेटवताना वाळलेल्या काटक्या, शेणकांड्या व नैसर्गिक वस्तूंचाच वापर करावा. तसेच "एक गाव – एक होळी" या संकल्पनेतून सामूहिक होळी साजरी करून लाकडांची नासाडी टाळावी, पूर्वीचे व आताचे पप्रदूषणाची भीषणता पाहता वृक्षतोड थांबवून प्रतिकात्मक होळी त्याच उत्साहाने साजरी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
रंगपंचमीबाबत जागृती :रासायनिक रंग टाळून फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंग वापरावेत, पाण्याची उधळपट्टी टाळून कोरडी होळी खेळावी, तसेच पक्षी, प्राणी व वृक्षांवर रंग टाकू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘वृक्षमैत्री होळी’ उपक्रम :होळीनंतर प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. होळीची राख सेंद्रिय खत म्हणून वापरावी. परिसर स्वच्छ ठेवून प्लास्टिकमुक्त सण साजरा करण्यावरही भर देण्यात आला आहे.फ्रेंड्स ऑफ नेचरच्या या उपक्रमातून “झाडे वाचवा, पाणी जपा आणि सण साजरा करा जबाबदारीने” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
पर्यावरणपूरक होळीच खरी सकारात्मक ऊर्जा देणारी होळी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.या उपक्रमामुळे उरण परिसरात पर्यावरण संवर्धनाबाबत व्यापक जनजागृती होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सणांचे पावित्र्य राखून जर अश्या पद्धतीने होळी व धुलीवंदन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जनजागृती संदेशात नमूद करण्यात आले आहे की, होळी हा आनंद, एकात्मता आणि निसर्गाशी नाते दृढ करणारा सण असला तरी सण साजरा करताना झाडांची तोड, रासायनिक रंगांचा वापर आणि पाण्याची नाहक उधळपट्टी यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.
संस्थेने जिवंत झाडांची तोड न करण्याचे आवाहन केले आहे. होळी पेटवताना वाळलेल्या काटक्या, शेणकांड्या व नैसर्गिक वस्तूंचाच वापर करावा. तसेच "एक गाव – एक होळी" या संकल्पनेतून सामूहिक होळी साजरी करून लाकडांची नासाडी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.