सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोणीतरी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कोणीतरी ओढतो; रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील 'चौकडी'वर हल्लाबोल
  • भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंहच्या वडिलांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी, नोएडातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
  • तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
  • दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली कोर्टातून निर्दोष मुक्तता, केजरीवाल हमसून रडले, म्हणाले, 'आम्ही नेहमी सांगायचो ...'
 क्राईम

पुण्यात धक्कादायक घटना: लग्नानंतर तीन महिन्यांत नवविवाहितेचा मृत्यू; सासरच्या छळाचा आरोप

डिजिटल पुणे    27-02-2026 16:42:27

पुणे: शहरातील बाणेर परिसरात घडलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत २७ वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सासरच्या छळामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृत महिलेचे नाव गंगा तेजस बेंबळकर (वय २७) असे असून तिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी तेजस शिवा बेंबळकर यांच्यासोबत झाला होता. तेजस यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतल्याची माहिती आहे. विवाहानंतर गंगाला सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

माहेरच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, सततच्या तणावाला कंटाळून गंगाने राहत्या इमारतीवरून उडी घेतली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला असून तपासादरम्यान एक चिठ्ठी आढळून आल्याची माहिती आहे. त्यातील मजकूर आणि कुटुंबीयांनी केलेले आरोप या दोन्ही बाबींचा सखोल तपास सुरू आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती