सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • 'मदत करा, माझा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय, त्याला परत आणा...'; मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदारांची आर्त हाक, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनाही साकडं
  • दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष उड्डाणे; आज फुजैराहून मुंबईकडे १६४ प्रवासी रवाना
  • इस्रायलची गुप्त नजर, सीसीटीव्ही ते मोबाईल नेटवर्कवर पकड; अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा
 विश्लेषण

पर्यावरण सायकल वारी निघाली साईंच्या दारी; ५० सायकलपटूंचा उत्साहात नारायणगाव टप्पा पूर्ण

डिजिटल पुणे    03-03-2026 11:24:55

दिघी : “पर्यावरण सायकल वारी… निघाली साईंच्या दारी…!!” या घोषवाक्यासह तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण सायकल वारीला पहाटे ठीक ४:३० वाजता साईरामच्या जयघोषात उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली. दिघी येथून निघालेल्या या वारीत एकूण ५० सायकलपटूंनी सहभाग घेत पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.

वारीचा पहिला ७० किलोमीटरचा टप्पा सकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ण करत सायकलपटू नारायणगाव येथे दाखल झाले. येथे शहरातील सुप्रसिद्ध Shreejay Hotelचे सर्वेसर्वा मा. सुनिल भाऊ इचके यांनी सर्व सायकलपटूंचे मनापासून स्वागत केले. अल्पोपहार व मसालेदार दुधाचे वाटप करून त्यांनी शिर्डी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर रखरखत्या उन्हातही सायकलपटूंनी जिद्दीने प्रवास सुरू ठेवला. अवघड चढ-उतार असलेला Chandanapuri Ghat सर करत दुपारी बारा वाजता सर्वजण जेवणासाठी जम्मू काश्मीर ढाबा येथे पोहोचले.पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत आणि साईंच्या दर्शनाची ओढ मनात ठेवत सायकल वारीचा पुढील प्रवास उत्साहात सुरू आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती